"महिला मेळावा 2023-पुणे-प्रथम (सकाळ) सत्र ....!"
"जबाबदारीसह घेते भरारी...
नाव तिचे नारी..!"
पुणे प्रतिनिधी
महिला मेळावा-प्रथम(सकाळ) सत्र मधील ठळक घडामोडी..
संपूर्ण सत्राचे सूत्रसंचालन दौंड येथील समाजभगिनी सौ.ज्योतीताई महेंद्र गोलांडे यांनी अतिशय सुंदर व प्रभावीरित्या केले.
श्रीगोंदा महिला बचतगट-यशोगाथा याचे सादरीकरण श्रीगोंदा येथील समाजभगिनी *सौ.पल्लवीताई केदार सिद्ध* यांनी केले.
महिलांचे आरोग्य विषयक समस्या,उपाय व मार्गदर्शन* याविषयक अतिशय अभ्यासू,वैद्यकीय क्षेत्रातील विविध दाखले देत अत्यंत प्रभावीरित्या मार्गदर्शन वारजे माळेवाडी,पुणे येथील समाजभगिनी डॉ.निलांबरी सुरेशचंद्र खुडे (एम.डी.) यांनी केले.
पहिल्या सत्रातील आयडल व प्रोफेशनल प्रॅक्टिकल मार्गदर्शन अर्थातच *केक व बेकरी व्यवसाय विषयक माहिती तसेच केक मेकिंग लाईव्ह डेमो याचे सादरीकरण-पुणे येथील महिला उदयोग व व्यवसाय कार्यशाळा तज्ञ मार्गदर्शक सौ.रोहिणीताई पराग हनमघर* यांनी केले.
" मानव सेवा हीच ईश्वरसेवा " तसेच " स्पर्श परिपूर्ण विश्वासाचा,ध्यास आरोग्यसेवेचा " या विचाराने प्रेरित कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक यांच्या वतीने *"मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर" याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत एकूण 85 महिलाभगिनी यांनी स्वतःची आरोग्यतपासणी करून घेतली.संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर सुनियंत्रण पुणे मनपा अंतर्गत धनकवडी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोलजी रमाकांत खडके यांनी केले.तसेच डॉ.कु.स्वप्नालीताई शहाजी गुजर(पुणे),नर्स कु.वृषालीताई करंजकर व कु. हर्षदा चोरगे(पुणे) यांचे सहकार्य लाभले.
यावेळी महिला मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिला भगिनी करिता *केळीच्या पानावर तसेच सुगंधी उदबत्तीच्या सुवासात,भारतीय महान संस्कृतीचे दर्शन घडवत, "सुग्रास पुणेरी जेवण (स्पेशल अळूच्या पानाची भाजी)"याची व्यवस्था करण्यात आली होती.भोजन व्यवस्था सुनियंत्रण जबाबदारी पुणे येथील समन्वयक श्री.जयंतशेठ प्रकाश सजगुरे* यांनी अतिशय कौशल्यपूर्ण रित्या पार पाडली. यावेळी त्यांना सर्व समन्वयक व भोजनव्यवस्था कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.