पद्मविभूषण मा कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
करंजे येथे "सोमेश्वर करंडक" 2023 भव्यक्रिकेट सामन्याचे आयोजन.
पद्मविभूषण मा कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी सोमेश्वर परिसरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या वतीने बुवासाहेब हुंबरे मित्रपरिवार आयोजित "सोमेश्वर करंडक" 2023 भव्य टेनिस बॉल गाववाईज व ओपन या पद्धतीचे सामने मंगळवार दि.२४ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये गलांडे स्टेडियम, सटवाई माळ मगरवाडी रोड करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या भव्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संग्राम सोरटे ,द्वितीय कृषी औद्योगिक संघ पुणे चेअरमन गौतम शहाजी काकडे , तृतीय- युवा उद्योजक चांगदेव जगन्नाथराव धुर्वे ,चतुर्थ - बाळासाहेबांची शिवसेनाचे बारामती तालुकाध्यक्ष स्वप्निल शहाजीराव जगताप यांनी दिलेले आहे.
परिसरातील सर्व दुकानदारांनी आपापल्या नावाच्या जाहिरातीचे बोर्ड मैदानावर लावण्याचे ठरलेले आहे. पवार वाढदिवस म्हणजे बारामती मध्ये एक प्रकारे सणाचा दिवस असतो असे संपूर्ण बारामती मध्ये हे चित्र पाहावयास मिळते.
या स्पर्धेचे सर्व सामने युट्युब लाईव्ह करण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे करंजे परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी डिसेंबर मध्ये घेण्यात येत असते परंतु पावसाच्या व्यक्तीमुळे याही वर्षी ही स्पर्धा जानेवारीमध्ये घेण्याचे आयोजित केलेले आहे.
या स्पर्धेचे अधिकृतरित्या उद्घाटन मंगळवारी दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर आणि श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते होणार आहे.
सर्व संचालक मंडळ, बक्षीस देणारे दानशूर, तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे.