सावधान ! निवडणुक मतमोजणीचे अनुषंगाने CRPC कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागु .
पुणे ग्रामीण जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुक मतमोजणीचे अनुषंगाने
CRPC कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागु करण्याबाबत.आदेश,ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडील वाचले क्र. १ नुसार विनंती केलेनुसार पुणे ग्रामीण जिल्हयातील दिनांक १८/१२/२०२२ रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असुन त्याची मतमोजणी
दिनांक २०/१२/२०२२ रोजी होणार आहे. सदर ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडणे आवश्यक आहे. तसेच मतमोजणी नंतर विजयी गटातील उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते, समर्थक हे मोठया प्रमाणात एकत्र येवून विजयी उमेदवारांची मिरवणुक काढणे, पराभुत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडणे, विरोधी गटातील कार्यकर्ते यांच्या अंगावर गुलाल उधळणे या गोष्टीमुळे दोन गटामध्ये, वाद
निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यासाठी उपाय योजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याबाबत कळविले आहे. आणि ज्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्हयातील दिनांक १८/१२/२०२२ रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी दिनांक २०/१२/२०२२ रोजी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने खबरदारी घेणेसाठी
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढणे आवश्यक झाले असल्याची माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी, मी डॉ. राजेश देशमुख,जिल्हादंडाधिकारी, पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम
१४४ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार पुणे जिल्हयात दिनांक १८/१२/२०२२ रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या दिनांक २०/१२/२०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातून पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात दिनांक २०/१२/२०२२ चे ००.०० ते २४:०० वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
१. ग्रामपंचायत निडवणूकीची विजयी मिरवणूक/ रॅली काढणे.
२. फटाके फोडणे / गुलाल उधळणे/ घोषणा देणे.
३. परवानगी शिवाय बॅनर / फ्लेक्स लावणे.
४. विनापरवानगी डी. जे. चा वापर करणे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीसपात्र राहतील. हा आदेश आज दिनांक १९ डिसेंबर, २०१२ रोजी सही व शिक्यानिशी देण्यात आला असे.