आरोग्यासाठी सकाळची सायकलिंग कधीही बेस्ट....
सध्या धावपळीच्या जीवनात सर्वजण आपल्या कामात गुंतलेले असतात पण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकीच महत्वाचे
सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
अशीच रोज सायकलींग करणारे पुरंदर तालुक्यातील निरा येथील उद्योजक दीपक आळंदीकर हे रोज निरा ते सोमेश्वर ( मु सा काकडे महाविद्यालय ) सायकलिंग करत असतात व त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले तसेच पुढे बोलताना म्हणाले की सर्वांनीच रोज सायकलिंग करणे तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजे जेणेकरून आपले आरोग्य सुदृढ राहते त्याबरोबर आजरांवर मात करता येते.