वाकी ! महाराष्ट्राचा जाणता राजा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार सौ.प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत मोतीबिंदू निदान शिबिर व नेत्र तपासणी संपन्न.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्राचा जाणता राजा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार सौ.प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत मोतीबिंदू निदान शिबिर व नेत्र तपासणी संपन्न. शुक्रवारी दिनांक १७/१२/२०२२ ठीक १० वा. नीता फरांदे(मा. सभापती- पंचायत समिती बारामती) व संजय गाडेकर(मा.सभापती- नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती निरा) सुचित्राताई साळवे (सदस्य- वितरण व्यवस्थापन समिती बारामती ) विलासराव जगताप(मा. व्हाईस चेअरमन -दूध संघ बारामती)यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख उपस्थिती सुखदेव शिंदे अध्यक्ष (श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था सोमेश्वर ) ,अनिल भंडलकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वाकी, किसन बोडरे सरपंच वाकी ,नितीन जगताप चेअरमन हनुमान विकास सोसायटी वाकी ,ग्रामसेवक नगरे भाऊसो ,सुधीर गायकवाड, इंद्रजीत जगताप ग्रामपंचायत सदस्य ,आजी-माजी सैनिक संघटना वाकी , हनुमंत जगताप पोलीस पाटील वाकी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष कुंडलिक जगताप, सोनवणे सर पीएसआय गायकवाड , व वाकीपंचक्रोशीतील सर्व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली
शिबिरामध्ये १५६ लोकांनी सहभाग नोंदवला ३५ लोकांना माफक दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले मोतीबिंदूचे ३० लोकांचे निदान झाले.