माळेगाव पोलीस स्टेशन अंकित पणदरे दुरक्षेत्र येथे सर्व पॅनल प्रमुख, उमेदवार, कार्यकर्ते, हस्तक यांची शांतता बैठक संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पणदरे, सोनकसवाडी या २ गावचे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रविवार दि ११ रोजी सकाळी ११ दरम्यान माळेगाव पोलीस स्टेशन अंकित पणदरे दुरक्षेत्र येथे सर्व पॅनल प्रमुख, सरपंचपद, सदस्य पदाचे उमेदवार, कार्यकर्ते, हस्तक यांची शांतता बैठक घेण्यात आलेली आहे, सदर बैठकीत आदर्श आचारसंहिता बाबत माहिती देण्यात आलेली असून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक कालावधीत कोणीही कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार नाही, गावामध्ये सामाजिक सलोखा कोणीही बिघडून देऊ नये , मतदार यांनी कोणाच्याही दबावाखाली न जाता मतदान करावे, व्हाट्सअप, फेसबुक वर कोणीही उमेदवार व पॅनल प्रमुख यांच्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड करू नये त्यामुळे गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे बाबत सूचना देणेत आलेल्या असून उपस्थितांना CRPC 149 प्रमाणे नोटीस अदा करणेत आलेल्या आहेत.