बारामती येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींची आयपीसी कलम ३०६ व ३०४(ब) मध्ये केली निर्दोष मुक्तता-अॅड. शहानुर श. शेख.
बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी दि. १२/४/२०११ रोजी आरोपी
नामे सत्यवान शिवराम खंडागळे, दिपक सत्यवान खंडागळे, अनिल सत्यवान खंडागळे व रंजना सत्यबान खंडागळे यांचेविरूध्द आयपीसी कलम ३०६, ३०४(ब), ४९८(अ), ३२३,५०४,५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला होता त्यामध्ये मे. जे. पी. दरेकर कोटर्टाने यांनी निर्दोष मुक्तता केली आणि सदरील सेशन केसमध्ये आरोपीतर्फे अॅड.
शहानुर श. शेख यांनी काम पाहिले फिर्यादी लक्ष्मण गोविंद भिसे यांनी त्यांची मुलगी ज्योती चे लग्न दिपक सत्यवान खंडागळे यांचेबरोबर करून दिले व लग्नानंतर दिपक खंडागळे यांनी नोकरीसाठी १
लाखाची मागणी केली व त्यास फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर दिपक खंडागळे व इतर
३ यांनी ज्योती हिचा हुंड्याकामी मानसिक, शारिरीक छळ व उपाशी पोटी ठेवले व
ज्योती हिला आत्महत्येस प्रवृत्त करून तिने स्वतः स्टोव्हमधील रॉकेल अगावर ओतून
घेवून स्वतःला पेटवून घेवून तिचा म्मृत्यू झाला अशी गुन्ह्याची हकीकत होती.
फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा होवून त्यामध्ये सरकारी वकील व बचाव पक्षातर्फे
अंतीम युक्तीवाद होवून मे. जे. पी. दरेकर कोर्टाने सत्यवान शिवराम खंडागळे व इतर
यांनी सदरील सेशन केसमधून निर्दोष मुक्तता केली.