जेजुरी ! जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी कटीबद्ध - रमेश लेंडे
पुरंदर - तीर्थक्षेत्र जेजुरीत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या तमाम भाविकांच्या सेवेसाठी कायम कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांनी दिली.
जेजुरीत पत्रकारांशी संवाद साधताना लेंडे हे बोलत होते.ते पुढे म्हणाले श्री मार्तंड देवसंस्थान च्या वतीने जेजुरीत येणाऱ्या भाविकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु अजूनही अधिकच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देणे तितकेच गरजेचे आहे .
त्यामध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभारणे गोर गरीब हुशार व गरजु मुलांसाठी शैक्षणिक संकुल उभारणे, तिरुपती बालाजीच्या धर्तीवर येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल यासाठी दर्शन मंडपाची उभारणी करणे, जेणेकरून दर्शन घेतल्यानंतर मंदिरा समोर असणाऱ्या कासवावर भाविकांना भंडारा व खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करता येईल तसेच यात्रा उत्सव काळात महिला पोलीस व कर्मचारी यांची संख्या वाढवणे , महाद्वार रोड व गडाभोवती सुलभ शौचालयाची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अशातच गडावर व मंदिरा भोवताली असणारी अतिक्रमणे हटवून त्यांना इतरत्र जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करणे, भाविकांसाठी अल्पदरात नव्याने भक्त निवासाची सोय करणे, पार्किंग साठी विस्तृत जागा करणे, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी चांगली सोय करणे, सार्वजनिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी यात्रा जत्रा काळात प्रतिबंधक उपाय योजना करणे यांसह आदी सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांनी स्पष्ट केले.