सोमेश्वरनगर ! आपल्या विरोधी विचार मांडणारा देशद्रोही ठरविणे चुकीचे - डाॅ.के.एल.गिरमकर
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मुगुटराव साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१ / १२ / २०२२ ते ०३/ १२ / २०२२ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे..
दि. ०१/१२/२०२२ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या उद्घटनाच्या दिवशी 'मानवी मूल्ये आणि शिक्षण ' या विषयावर प्रा.डाॅ. कान्हू गिरमकर यांनी विचार मांडले. भारत हा बहुसांस्कृतिक व बहुभाषिक देश आहे , भारतात अनेक जाती- धर्माची, भाषिक , भौगोलिक , सांस्कृतिक भेद असणारी माणसे राष्ट्रीयत्वाच्या छताखाली एकत्र राहतात. विविधतेत एकता हे भारताचे सामर्थ्य आहे. लोकशाहीमध्ये विरोधी मताचा आदर करणे महत्त्वाचे आहे, आपल्या विरोधी विचार मांडणारा देशद्रोही ठरविणे चुकीचे आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.अभिजित काकडे देशमुख हे होते. त्यांनी कै . मुगुटराव आप्पांच्या स्मृतींना अभिवादन करून व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डाॅ देविदास वायदंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून कै.मुगुटराव आप्पांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून सांगितले. सहसचिव श्री . सतीश लकडे हे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. त्यामध्ये कै.मुगुटराव काकडे देशमुख यांच्या कार्याचा आढाव घेवून त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डाॅ.नारायण राजूरवार यांनी आभार मानले