जवळच्या व्यक्तीसोबत आपण अनेक सुख दुःख सांगत असतो मग वाढदिवस पण त्यांच्या सोबतच साजरा करावा.
बौद्ध विहार करंजे येथे गुरुवर्य एस.एस.गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
सोमेश्वरनगर - प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस विशेष असतो म्हणजे वाढदिवस. प्रत्येकाला वाटते की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी खुप छान साजरा करावा.अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांना सुद्धा वाटत वाढदिवस हा केक कापून करावा.कुठेतरी लांब त्या दिवशी फिरावे अशा अनेक कल्पना प्रत्येक जण करतात.
काही जण आपल्याला जवळच्या व्यक्तीसोबत वाढदिवस साजरा करतात.जवळच्या व्यक्तीसोबत आपण अनेक सुख दुःख सांगत असतो मग वाढदिवस पण त्याच्या सोबत साजरा करावा असे वाटणे अगदी साहजिकच असते.
बारामती तील सोमेश्वर नगर मध्ये सोमेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तर एक मुख्याध्यापक पर्यंत ज्यांनी आपल्या कर्तुत्वावर शालेय जीवनात तसेच जीवन जगत असताना सामाजिक कार्य तसेच वेळोवेळी सर्वांच्याच मदतीला व मोलाचा सल्ला देणारे आणि राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय शेतकरी बचत गट कंरजे चे सचिव एस.एस.गायकवाड सर यांचा वाढदिवस करंजे येथील बौद्ध विहार मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष प्रकाशराव हुंबरे , खजिनदार किशोरजी हुंबरे, बचत गटाचे सदस्य अनिल गायकवाड अनिल हुंबरे आणि बौद्धाचार्य बाबुराव हुंबरे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुंबरे पांडुरंग हुंबरे ,दौलतराव साळवे ,बापू साळवे अजिंक्य हुंबरे ,सुरज रणवरे गायकवाड मनोज अजय भोसले ,ओंकार जाधव ,संग्राम हुंबरे इ.उपस्थित होते.