बारामती तालुक्यात प्रचाराला जोर.
सरपंचपदाच्या उमेदवारांची प्रतिष्ठा लागली पणाला
सोमेश्वरनगर (वार्ताहर)
बारामती तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणारआहे.मोरगाव,वाघळवाडी पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी - भापकर मासाळवाडी व पळसी अशा एकूण १३ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे .ग्रामपंचायतीसाठी रविवारी दिनांक १८ मतदान होत आहे, उमेदवारांच्या प्रचाराला गावागावातून वेग आला आहे प्रचारासाठी पारंपारिक साधनांसह हायटेक उपकरणांचाही वापर करण्यात येत आहे सरपंच पदासाठी गावातील दिग्ग जांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र सर्वच गावां
मधून दिसत आहे , सर्व पक्षाचे नेते सध्या आता गावच्या राजकारणात गुरफटून गेले आहेत.