रोजगार भरती मेळाव्यात १६९ उमेदवारांची निवड
पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून नोंदणी केलेल्या १९० पैकी १६९ उमेदवारांची निवड करण्यात आली.
या मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण ३२ आस्थापना सहभागी झाल्या होत्या. उपस्थित आस्थापनांची विविध व्यवसायांकरीता १०५२ शिकाऊ उमेदवारांची मागणी होती. परंतु प्रत्यक्षात १९० उमेदवार उपस्थित राहिल्याने त्यापैकी १६९ उमेदवारांची निवड करण्यात आली.
औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक बी. आर. भावसार यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यशवंत कांबळे, गणित निदेशक श्रीमती जी. बी परदेशी, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. आर. खुडे व डी. टी.चौधरी आदी उपस्थित होते.