Type Here to Get Search Results !

स्वाधार योजनेच्या लाभर्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

स्वाधार योजनेच्या लाभर्थ्यांना  प्रमाणपत्राचे वाटप
पुणे: समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेअंतर्गत  पात्र ठरलेल्या अर्जदारांना समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप     करण्यात आले. 

 कार्यक्रमास समाजकल्याण सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त  विजयकुमार गायकवाड, , बाळासाहेब सोळंकी,  प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त संगिता डावखर, विशेष अधिकारी एम. आर. हरसुरे आदी  उपस्थित होते.

यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले,  स्वाधार योजनेअंतर्गत २५  कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली आहे. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न  मिळालेल्या  विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. स्वाधार योजनेचा लाभ तालुकास्तरावरही मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.

प्रत्येक महाविद्यालयात समानसंधी केंद्र स्थापन करण्यात आलेले असून त्यामार्फत समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार विद्यार्थ्यांनी अंमलात आणावे. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगून  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचाही लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.नारनवरे यांनी केले. 

याप्रसंगी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक  स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

सहआयुक्त (शिक्षण) भारत केंद्रे यांनी समाजकल्याण समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, स्वाधार, परदेश शिष्यवृत्ती इत्यादी योजनांची माहिती दिली. 

प्रास्ताविकात सहायक आयुक्त संगिता डावखर  स्वधार योजनेअंतर्गत प्राप्त अर्जावर आठ दिवसात कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.


                              

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test