Type Here to Get Search Results !

आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा दि. १३ डिसेंबर पासूनअधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ सह इतर माहिती.

आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा दि. १३ डिसेंबर पासून

अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ सह इतर माहिती.
नाशिक:  - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र - 2022 अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि. 13 डिसेंबर 2022 पासून प्रारंभ होत आहे. 
         विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, हिवाळी सत्र - 2022 मधील परीक्षा राज्यातील एकूण 171 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे 46,000 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार सदर परीक्षा 30 डिसेंबर 2022 पर्यंत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         हिवाळी सत्र - 2022 परीक्षेत पदवी अभ्यासक्रमाचे  First Year MBBS (Old) Supplementary, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPTh, BOTh, P.B.B.Sc., Basic B.Sc., B.P.O., BASLP, व PG - DM, MCh, M.D.S., Diploma Dentistry, MD/MS Ayurveda & Unani, MD Homoeopathy, Diploma Ayurveda, MOTh, MASLP, M.Sc. (Aud.), M.Sc. (SLP), MPO तसेच University Courses – BPMT, M.Sc. Pharmaceutical, MPH (N), MBA, M.Phil., Optometry, Diploma Optometry, Diploma Ophthalmic, Diploma paramedical, PG DMLT, CCMP या 
अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
        
परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test