Type Here to Get Search Results !

बारामती ! कुरणेवाडी येथे ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

बारामती ! कुरणेवाडी येथे ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
बारामती - कृषि विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील प्रगतशील शेतकरी तानाजी पवार यांच्या प्रक्षेत्रावर ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन प्रात्याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी पाचट कुजविण्याचे फायदे  तसेच खर्चात बचत करून उत्पन्नवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा व अन्नद्रव्यांचा नाश होतो. ऊसाच्या पाचटात ०.५० टक्के नत्र, ०.२० टक्के  स्फुरद, १ टक्के पालाश आणि ४० टक्के सेंद्रिय कर्ब असतो. ऊसाचे पाचट जाळल्यामुळे पर्यावरण प्रदूषण होऊन आजारांचे प्रमाण वाढते असेही त्यांनी सांगितले.

कृषि विभागाच्या महाडीबीटी अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, कांदाचाळ, ठिबकसिंचन, रब्बी पीक विमा, महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड,  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी योजनांची  श्री. तांबे यांनी  माहिती देऊन ऊसाचे पाचट कुजवण्याविषयी शेतकऱ्यांना आवाहन केले.

मंडळ कृषि अधिकारी हिंदुराव मोरे यांनी प्रत्यक्ष प्लॉटवर बुडके छाटणे, पाचट योग्य पद्धतीने पसरविणे, रासायनीक खते व जिवाणू खते देण्याची पद्धत याबाबत प्रात्याक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कृषि पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, जिव्हाळा शेतकरी बचत गटाचे सदस्य, तानाजी पवार, लक्ष्मण भोजने, शेतकरी आदी उपस्थित होते.

                            

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test