अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजातीय गौरव दिवसाचे आयोजन बारामती येथे रविवार, दिनांक २८ नोहेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.धीरज शिंदे उपस्थित होते, त्यांनी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी भारताला स्वातत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रंजांसोबत केलेल्या युद्धांना उजाळा देत, आदिवासी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी सोबत रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावा यावर मार्गदर्शन केले.
डॉ.मिलिंद जोशी (TRTI) प्रकल्प समन्वयक आणि विषय विषेशज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संस्थेत सुरु असणाऱ्या विविध योजना तसेच सदर जिल्ह्यामध्ये तयार होणारे विविध पदार्थ व त्यांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न पदार्थ उद्योग योजना (PMFME) या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात यवतमाळ येथील आदिवासी विद्यार्थी कु.शिवम मेश्राम आणि ग्रुप यांनी आदिवासी दंडा नृत्य, कु.सोनम उईके आणि ग्रुप यांनी आदिवासी ढेमसा नृत्य, उमा भुरके आणि ग्रुप यांनी गोंडी नृत्य, प्रीतम कोटनाके आणि ग्रुप यांनी आदिवासी कुरकु गोंड पारंपारिक वेशभूषा, मंगेश किन्नाके आणि ग्रुप यांनी महिला सबलीकरण पथनाट्य, चेतन फुपरे, हर्षाली जुमनाके, दुर्गा ढोके यांनी आदिवासी कलाकृती आणि आदिवासी समाज सक्षमीकरण यावर आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर पूजा मडावी, अजय मडपाचे, अखिल अत्राम, दिपाली सलाम, सागर रिंगणे इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
श्री. प्रशांत गावडे, प्रशिक्षण समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बारामती आणि कु. शिवानी सलाम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. अक्षय कुंभार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.
यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर चे नर्सिंग कॉलेज येथील प्राध्यापिका सौ. अश्विनी जाधव आणि सौ. प्रभा रणपिसे यांसह पुणे, यवतमाळ, नागपूर, नांदेड, बीड आणि वाशीम जिल्ह्यातील १७७ विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.