CRIME NEWS वन्यप्राण्याची अवैध रित्या शिकार करणाऱ्या एका व्यक्तीस .... पर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश -शुभांगी लोणकर.
बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव येथे दिनांक ११ रोजी मालकी क्षेत्रात अवैध रित्या शिकार होत असल्याची गुप्त माहिती मिळालेवरुन श्रीमती शुभांगी लोणकर वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांचे समवेत हेमंत प्रभाकर मोरे वनपाल बारामती व बाळु विठ्ठल गोलांडे वनरक्षक बारामती यांनी मौजे माळेगाव येथील रविंद्र चंदरराव काटे वय ६० यास मृत वन्यप्राणी ससा - ०१ वाघर जाळी - ०३,दुचाकी क्र. एम. एच. ४२ एक्स ६७३२ गाडी सह Common Indian hare (सशाची) शिकार करत असताना रंगेहात पकडला अटक केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बारामती यांचे न्यायालयात हजर करण्यात आले असता मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक १४ अखेर पर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.आरोपीकडून खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरील कारवाई एन. आर. प्रवीण मुख्य वनसंरक्षक (प्रा), राहुल पाटील उपवनसंरक्षक पुणे वनविभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मयुर बोठे सहाय्यक वनसंरक्षक (सांख्यिकी) पुणे वनविभाग पुणे व शुभांगी लोणकर वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या चमुने यशस्वीरित्या पार पाडली. घटने बाबतचा पुढील तपास सुरु आहे.