Type Here to Get Search Results !

CRIME NEWS ऑक्सीटोसीन या औषधाची अवैद्यपणे निर्मिती,साठवणुक करून त्याचा गैरवापर जनावरांचे दुध पाणवण्यासाठी विक्री व वितरण करणारी परराज्यातील टोळी जेरबंद.

CRIME NEWS ऑक्सीटोसीन या औषधाची अवैद्यपणे निर्मिती,साठवणुक करून त्याचा गैरवापर जनावरांचे दुध पाणवण्यासाठी विक्री व वितरण करणारी परराज्यातील टोळी जेरबंद.
पुणे - अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडुन ऑक्सीटोसीन या औषधाची अवैद्यपणे निर्मिती,
साठवणुक करून त्याचा गैरवापर जनावरांचे दुध पाणवण्यासाठी विक्री व वितरण करणारी
परराज्यातील टोळी जेरबंद करुन कि रु ५३.५२,५२०/- चा ऑक्सिटॉसिन साठा जप्त.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थ
विक्री करणारे गुन्हेगार यांचे बाबत माहिती काढून कडक कारवाई करणे बाबत अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक श्री विनायक गायकवाड यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक ०५/११/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी
पथक १ गुन्हे शाखेचे अधिकारी व स्टाफ असे कार्यालयात हजर असताना पथकातील पोलीस हवालदार २९६२ पांडुरंग पवार
यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, स. नं. २५९ गट नं. १९/२/१ कलवड वस्ती यौध्द विहार
रोड, लोहगांव पुणे ३२ या ठिकाणी असणारे पत्र्याचे शेडमध्ये जनावरांना दुध पाणवण्यासाठी देण्यात येणा-या कुपीचा,
इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा केला आहे. नमुद प्रमाणे मिळालेली बातमी पोलीस हवालदार पांडुरंग पवार यांनी वरिष्ठ पोलीस
निरीक्षक श्री विनायक गायकवाड, अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांना तात्काळ कळविली असता, त्यांनी
लागलीच सदरची माहिती वरिष्ठांना कळवुन, त्यांनी दिलेले मार्गदर्शन व सुचना नुसार त्याबाबत अन्न व औषध प्रशासन पुणे
येथील अधिकारी यांना कळविले व कारवाई करीता हजर राहणे बाबत सांगितले. त्यानंतर सदर मिळालेले बातमीचे ठिकाणी
जावुन वर नमुद स्टाफ अधिकारी यांनी छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी असणारे जागेत एका पत्र्याचे शेड मध्ये
वेगवेगळ्या पुढयाचे बॉक्स मध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ऑक्सिटोसिन या द्रावणाचा साठा करुन ते विक्री करीता पॅकिंग करुन
ठेवलेले दिसले. तसेच त्या ठिकाणी इसम नामे समीर कुरेशी मुळ रा. उत्तर प्रदेश हा त्याचे पश्चिम बंगाल येथील साथीदार यांचे
मदतीने (२) विश्वजीत जाना (३) मंगल गिरी (४) सत्यजीत मौन्डल, (५) श्रीमंता हल्दर ऑक्सिटॉसिन औषधाचे उत्पादन
करुन ते औषध कुपी व इंजक्शन मध्ये भरत असताना दिसुन आले. त्याबाबत त्यांचेकडे केले चौकशीत त्याचा एक साथीदार
सदरचे द्रावण तयार करुन देत असल्याचे व ते मुख्य आरोपी समीर कुरेशी पुणे शहर व जिल्हयातील जनावरांचे गोठयाचे
मालक यांना बेकायदेशिररित्या पुरवित असल्याचे माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सोबतचे अन्न व औषध प्रशासन विभागकडील
अधिकारी श्री. दिनेश माणकचंद खिवसरा, सहा. आयुक्त, अन्न औषध प्रशासन पुणे. श्री. आतिष सरकाळे, श्री सुहास सावंत,
औषध निरीक्षक पुणे यांचे मदतीने त्या ठिकाणी असणारे सर्व साठयांची सहा पो निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी पाहणी करुन
छापा कारवाई करुन इसम नामे (१). समीर अन्दर कुरेशी वय २९ वर्षे रा. स. नं. २९ गट नं. १ ९/२/१ कलवड वस्ती लोहगांव
बुध्द विहार रोड पुणे. मुळ रा. संदिगनगर गल्ली नं. ५ जि. मेरठ राज्य उत्तर प्रदेश (२). विश्वजीत सुधांशु जाना वय ४४ वर्षे
रा. पुरबा बार इलासपुर पुरबा मदीनीपुर पश्चिम बंगाल पिन ७२१६०१ (३) मंगल कनललाल गिरी वय २७ वर्षे रा. तिराईपुर
विलास पुर इस्ट मदिनपुर पश्चिम बंगाल ७२१६०१ (४) सत्यजीत महेशचंद्र मोन्डल, वय २२ वर्षे रा. नवासन कुस्तीया पंचायत
साऊत २४ परगना, पश्चिम बंगाल ७४३३३० (५) श्रीमंता मनोरंजन हल्दर वय ३२ वर्षे रा. नलपुरकुर मंडाल परा गिलरचंट
साऊत २४ परगना पश्चिम बंगाल ७४३३५४ यांना ताब्यात घेवुन सदर ठिकाणी एकुण किंमती रुपये ५३५२५२०/- चा
ऑक्सिटॉसिन साठी लागणारा तयार माल कच्चा माल, पॅकींग मटेरीयल आरोपी यांचे मोबाइल फोन असा साठा मिळुन
आल्याने जप्त करण्यात आला आहे. नमुद ऑक्सिटोसिन औषध हे आरोपी समीर कुरेशी हा गाई, म्हशीचे गोठा मालक यांना
विक्री केल्यानंतर ते औषध गाई म्हशी यांना त्याचे दुध पाणवण्यासाठी दिले नंतर गायी म्हशी पासुन मिळणारे दुध हे मानवी
आरोग्यास हानीकारक होत असुन त्याचे सेवन केल्याने आरोग्यावर विषारी परिणाम होतात जसे श्रवण कमजोरी दृष्टीहिनता,
पोटाचे आजार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रीचा रक्तस्त्राव व अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे व त्वचेचे आजार इत्यादी
गंभीर रोग होण्याची शक्यता आहे. सदरचे ऑक्सीटॉसिन हे हार्मोन असुन त्याचा वापर प्रसुती सुरळीत करण्यासाठी होत
असल्याचे श्री सुहास सावंत औषध निरीक्षक पुणे यांनी सांगुन नमुद आरोपी विरुध्द त्यांनी विमानतळ पो स्टे येथे भा द वि
कलम ३२८, ४२० १७५, २७२, २७४. ३४ व प्राण्यांना क्रुरतेणे वागवण्यास प्रतिबंध करण्या बाबत अधिनियम १९६० अंतर्गत
कलम ११ ग व कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे. मा. सहा पो
आयुक्त, गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शन व सुचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पो
निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी,
संदिप शिर्के, सचिन माळवे, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test