... त्या विद्यार्थ्यांबरोबर वाढदिवस साजरा केला अनं... आनंद द्विगुणित झाला.
सोमेश्वरनगर - वाढदिवस प्रत्येकाच्याच आयुष्याचा अपरिहार्य भाग असतो , प्रत्येकाच्या जीवनाचा अनामिक आणि क्षणिक आनंद देणारा क्षण... आनंद क्षणिकच पण इतरांमध्ये लाखो कणानी वाटणारा क्षण... अशाच विशाल क्षणाच्या आनंदाचे वाटेकरी उत्कर्ष आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना होता आले. नंदकुमार ढगे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना विविध फळे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी रोख रु ५,०००/-₹ ची भेट दिली. त्यांच्या वैयक्तिक आनंदाचा क्षण त्यांनी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर साजरा करत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.आणि ढगे यांचे वर्तन विद्यार्थ्यांसाठी तसेच समजासाठी उद्बोधक तसेच मार्गदर्शक ठरणार यात काही शंका नाही अशी भावना संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी व्यक्त केली. आजची तरुण पिढी वाढदिवसासाठी नाहक खर्च करत असताना ढगे यांचे कार्य तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल . यावेळी चैतन्य सावंत, संभाजी काकडे, प्राचार्या रोहिणी सावंत उपस्थित होते.