करंजे ! तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत करंजे भाग शाळेचे यश...
सोमेश्वरनगर - बारामती क्रिडा संकुल, बारामती येथे काल दि.२६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सोमेश्वर विद्यालय भाग शाळा,करंजे येथील आदेश नवनाथ धायगुडे इ.७ वी या विद्यार्थ्याने ३८ किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक
पटकाविला.
बारामती तालुका क्रिडा विभाग यांच्या वतीने या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. बारामती तालुक्यातील अनेक शाळा यामधे सहभागी झाल्या होत्या. आदेश धायगुडे याने ३८ किलो वजन गटात यशाला गवसणी घालत पुणे जिल्हा स्तरावरील कुस्ती स्पर्धेत मैदान गाजविण्याची संधी मिळवली आहे.
आदेश याला विद्यालयाचे क्रिडा शिक्षक यू.एस जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य बी.एस.मिंड, उपप्राचार्य ए.एस.भोसले व पर्यवेक्षक एन.ए.निगडे यांनी त्याचे अभिनंदन केले.