कऱ्हावागज येथील आठवडी बाजारात पीक विमा योजनेचा प्रचार
बारामती दि. १३ : मौजे क-हावागज तालुका बारामती येथे आठवडी बाजारात कृषि विभागामार्फत खरीप हंगाम पिक विमा योजनेचा प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली.
शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचवण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत पिक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, शेतकरी मेळावे, शेतकरी सहली व विविध विस्ताराच्या योजना राबविल्या जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून कृषि सहाय्यक संतोष पिसे यांनी क-हावागज येथील शनिवारी भरणा-या आठवडी बाजारात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२ बाबत भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना पोस्टर वाटप करून माहिती दिली. पिक विमा योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वर्षी बीड पॅटर्न च्या धर्तीवर कप अँड कॅप मॉडेल (८०:११०) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र धरून योजना राबिवण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन मंडळ कृषी अधिकारी अरविंद यमगर व कृषी पर्यवेक्षक किसन काझडे यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगतशील शेतकरी मच्छिद्र मुलमुले, गणेश धोत्रे, प्रमोद गावडे, बाळू लोणकर, प्रशांत बनकर, हनुमंत बनकर व इतर शेतकरी यांनी सहकार्य केले.