सोमेश्वरनगर ! तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळेची अमृता शिंदे प्रथम क्रमांक.
सोमेश्वरनगर - बारामती क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बारामतीतील वाघळवाडी येथील उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी अमृता संजय शिंदे (इयत्ता ८वी) हिने ३६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. अमृताची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, आश्रमशाळेच्या प्राचार्या रोहिणी सावंत आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. अमृताचे चुलते भगवान शिंदे यांचे मार्गदर्शन अमृताला लाभले.