मुलांमधील सर्जनशीलतेला वाव मिळाल्यास मुले इतिहास घडवतील- राजेंद्रकुमार सराफ
बारामती : मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे त्यांना चांगली संधी मिळाली की ते त्या संधीचे सोनेच करणार. मुलांमधील सर्जनशीलतेला वाव मिळाल्यास मुले इतिहास घडवू शकतात.असा विश्वास पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक रो. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केला.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131, पर्यावरण समिती, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "कचऱ्यातून नवनिर्मिती (upcycling)" प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष रो. प्रा. डॉ. अजय दरेकर होते, याप्रसंगी व्यासपीठावर या स्पर्धेच्या परीक्षक रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या पर्यावरण समितीच्या प्रमुख रो. गौरी शिकारपूर, रो. सुजाता कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ बारामतीचे सचिव रो. अरविंद गरगटे, खजिनदार रो. रविकिरण खारतोडे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे विभागीय असिस्टंट गव्हर्नर रो. निखिल मुथा,या प्रदर्शनाच्या मुख्य संयोजक रो. दर्शना गुजर, क्लबचे शाळा विभागाचे संचालक रो. अली असगर बारामतीवाला, विनोदकुमार गुजर बालविकास मंदिरचे मुख्याध्यापक आशिष घोषआदी मान्यवर उपस्थित होते.
रो. राजेंद्रकुमार सराफ आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,मुलांवर विश्वास ठेवून त्यांना विविध प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणे महत्वाचे असते. मुलांना शालेय वयात खूप सारे प्रश्न पडत असतात अशा वेळी मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर पालकांनी आणि शिक्षकांनी चिडून जाऊ नये, मुलांना व त्यांच्या प्रश्नांना दुर्लक्षित करण्याऐवजी त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी मदत केली पाहिजे.यावेळी परीक्षकांचे मनोगत व्यक्त करताना रो. गौरी शिकारपूर म्हणाल्या की, कचऱ्यातून काही नविन वस्तू निर्माण करता येतात हे विद्यार्थ्यांना समजल्यावर विद्यार्थी कचरा करणार नाहीत अथवा कमी करतील, कचऱ्याचे दुष्परिमाण नव्या पिढीला समजले तर आपण कमीत कमी कचरा करू आणि होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावू. मुलांमध्ये हा संस्कार रुजविण्याचे काम रोटरी जगभरात करीत आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या सचिव adv. निलिमा गुजर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नीलिमा गुजर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धा अतिशय महत्वाच्या असतात,यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. रोटरीचे विद्यार्थ्यांसाठीचे जगभरातील काम हे वखाणण्यासारखे आहे यापुढील काळात रोटरी क्लब ऑफ बारामती कडून असेच भरीव काम व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दोन्ही सत्राच्या अध्यक्षपदावरून बोलताना रो. डॉ. अजय दरेकर यांनी रोटरी क्लब ऑफ बारामती च्या कामांची माहिती उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. दर्शना गुजर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रो. रविकिरण खारतोडे आणि सपना दंडवते यांनी करून दिला तर आभार रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष आदित्य भावसार आणि क्लबचे सचिव रो. अरविंद गरगटे यांनी मानले. या प्रसंगी रो. अतुल गांधी, रो. संजय दुधाळ, रो. स्वप्नील मुथा यांचे सह रोट्रॅक्ट क्लब आणि इन्ट्रॅक्ट क्लबचे सदस्य, रोटरी क्लब सदस्यांच्या परिवारातील अनेक कुटुंबीय उपस्थित होते.कचऱ्यातून नवनिर्मिती या स्पर्धेत बारामती तालुक्यातील पाच शाळांच्या प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या सुमारे 164 पैकी शंभरहुन अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनाला सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली.हे प्रदर्शन व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सभासदांबरोबर विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच साकल्प शॉपी (एम.आय.डी.सी.) यांचेकडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्याबद्दल सहभागी शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेतील बक्षिस विजेते असे
इयत्ता सहावी :-
1.प्रथम - वेद पाटील (सायरस पुनावाला स्कुल, एमआयडीसी, बारामती)
2.द्वितीय - शर्वरी जगताप (सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कुल, सोमेश्वरनगर)
3.तृतीय - वैष्णवी शेंडकर (सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल, सोमेश्वरनगर)
इयत्ता सातवी :-
1. आर्यन ताकवले (सीबीएसई स्कुल, एमआयडीसी, बारामती)
2. तीर्था चोभारकर (सीबीएसई स्कुल,एमआयडीसी, बारामती )
3. यथार्थ शून्डे (सायरस पुनावाला स्कुल, एमआयडीसी, बारामती )
4. गायत्री सरवदे (सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल, सोमेश्वरनगर )
5. शुभराज खोडके (सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल, सोमेश्वरनगर )
इयत्ता आठवी :-
1.आदिती दरेकर (सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल, सोमेश्वरनगर )
2.श्रीराम सावंत, अर्जुन जगताप (विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती )
3.तिलक राज (सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल, सोमेश्वरनगर )
4.पलक भोसले, माही शिंदे (विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती )
5.श्रेया पवार (न्यू बालविकास मंदिर, पिंपळी )
इयत्ता नववी :-
1.नक्षत्र माने (विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती)
2.ख़ुशी सोनी, राही तिवाटणे, आर्या ओझर्डे (विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर बारामती )
3.शिवाली झगडे (विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती)
स्पर्धेतील विजेत्यांना रोटरी क्लब ऑफ बारामती कडून प्रमाणपत्र व साकल्प शॉपीचे संचालक श्री अमित शहा यांचेकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.