सासवड ! दिवे घाटाचा राजा बिरुंद मिरवणारा शर्यतीचा बैल 'नखऱ्या' चा शोकाकुल वातावरण दशक्रिया विधी.
पुरंदर - पुणे जिल्ह्यातील वडकी येथील गायकवाड कुटुंबीयांनी आपल्या मुलाप्रमाणे नखऱ्या या बैलाला जीव लावला आणि या नखरे ने देखील आपल्या वेगाच्या जोरावर अनेक शर्यतीत नंबर मिळवला. यात दिवेघाटाचा राजा, हवेलीचा सर्जा -राजा किताब, कारुंडे केसरी किताब व अनेक बैलगाडा शर्यती नंबर पटकावले व आपल्या मालकाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवले होते. त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबीयावर शोककळा पसरली.या कुटुंबाने त्यांचा विधिवत अंत्यविधी पार पाडला. वडकी ,तळेवाडी या ठिकाणी दशक्रिया विधी चा कार्यक्रम पार पडला. त्याचीच चर्चा संपूर्ण परिसरात आहे. नखऱ्याची नेहमी स्मरण राहावे ,महणून समाधी घाट बांधून त्यावर हुबेहूब नकरेची प्रतिकृती उभी केली आहे. जेणेकरून रोज या नखरयाची पूजा होईल . या बैलाचे मालक कैलास गायकवाड व त्यांचे बंधू शंकर गायकवाड यांच्या परिवाराच्या वतीने दशक्रियेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या दशक्रिया विधीला हरिभक्त परायण प्राजल पानसरे यांचे प्रवचन देखील आयोजित केले होते. उपस्थितानी श्रद्धांजली वाहिली .निवेदन करताना अशोक गायकवाड यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात पाणी आले. या दशक्रिया विधीला बैलगाडा शर्यत शौकीन ,ग्रामस्थ ,पाहुणे मंडळी तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. दशक्रिया निमित्त प्रवचन हरिभक्त परायण पानसरे यांनी सांगितले की माणसाचा दशक्रिया होतो .मी अनेक ठिकाणी दशक्रिया विधीला प्रवचन देखील केले आहे. परंतु आज बैलाचा दशक्रिया होत आहे व माझ्या आयुष्यातला प्राण्याचा हा पहिलाच दशक्रिया विधी आहे. यावेळी श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्र केसरी पैगंबर दत्ता गायकवाड यांनी सांगितले की ,प्राणिमित्र संघटनांनी आमच्या कुटुंबाचा आदर्श घ्यावा. नुसते वरवर प्रेम दाखवून चालणार नाही .शेतकरी व बैलाचे हे बाप -लेकाप्रमाणे नाते असते. प्राणी मित्र असल्याचा नुसता पुळका आणतात; परंतु ते कोणतेही प्राणी पाळत नाही.