बारामती ! पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज तहसिल कार्यालयामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.