मानवाधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र राज्य मीडिया संघटक पदी मोहम्मद शेख
मानवाधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत विविध कार्यकारणी पदांची नियुक्ती
पुणे - मानव अधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत आज तळेगाव ढमढेरे,पुणे या ठिकाणी कार्यकारणी नियुक्तीची बैठक रविवार दि २० रोजी पार पडली असून यामध्ये बारामती, फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा मीडिया संरक्षण उपाध्यक्ष पदी बिलकीस पठाणशेख यांची नियुक्ती करण्यात आली तर मानवाधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र राज्य मीडिया संघटक पदी बारामतीतील वाणेवाडी येथील मोहम्मद शेख यांची निवड करण्यात आली तसेच सामाजिक व न्याय विभागामध्ये बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील भिष्माचार्य मोरे यांची बारामती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून या पदनियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी प्रमोद फुलसुंदर (राष्ट्रीय सचिव तथा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) तसेच मानव अधिकार फाउंडेशन भारत चे मीडिया संरक्षण उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य धनराज बाळासो जगताप, सामाजिक व न्याय विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नेमाजी आप्पासो वायसे आदी मान्यवर उपस्थित होते.