विद्या प्रतिष्ठानमध्ये आनंदाची लयलूट;
'आनंदजत्रा' संपन्न.
सोमेश्वरनगर - विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ( ता बारामती) वाघळवाडी येथे 'आनंदजत्रेचे' आयोजन करण्यात आले . दैनंदिन शाळेच्या व्यस्त वेळापत्रकातून मुलांना दिलासा मिळावा तसेच शैक्षणिक धडे ही गिरवता यावे हा दुहेरी उद्देश साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी ठीक विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य डॉ. राजीव शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मुलांना आवडतील तसेच त्यांच्या कौशल्यांना वाव देतील अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या आनंदजत्रेत मुलांनी पालकांनी विविध खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद लुटला या आनंद जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भूतबंगला डी.जे. डान्स अशा अनेक प्रकारांचा समावेश होता. या कार्यक्रमांचे नियोजन व संचलन शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षिका दीप्ती जगताप, शितल बालगुडे ,शुभांगी बारवकर, रेहाना मुलानी यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या उत्कृष्ट सुनियोजन यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या जत्रेला पालक विद्यार्थ्यांचा तसेच परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.