Type Here to Get Search Results !

पुरंदर ! कला क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जेजुरीतील अमोल बेलसरे यांची निवड.सुदान, साऊथ आफ्रिका, इथोपिया, इजिप्त व इजरायल या देशात करणार कला सादर.

पुरंदर ! कला क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जेजुरीतील अमोल बेलसरे यांची निवड.

सुदान, साऊथ आफ्रिका, इथोपिया, इजिप्त व इजरायल या देशात करणार कला सादर.
पुरंदर  - पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र जेजुरी येथील कला क्षेत्रात अग्रेसर असलेला नामवंत कलाकार "तबला अलंकार" अमोल बेलसरे यांची पाच देशांच्या दौऱ्यावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे 
वयाच्या अडीच वर्षांपासूनच तबला या विषयाची आवड असणारे अमोल बेलसरे यांनी  त्यांचे मामा श्री दत्तप्रसाद खाडे व गोविंदजी कुडाळकर यांच्याकडे तबल्याचे प्राथमिक धडे घेतले पंडित उमेश मोघे यांच्याकडे अजुन ते तबल्याचे पुढील शिक्षण घेत आहेत कलाक्षेत्रातच आपले करिअर करावे असा ध्यास घेतलेल्या या ध्येयवेढ्या अवलिया ने  सात हजार पेक्षा जास्त स्टेजवर प्रोग्राम केले आहेत यामध्ये पंडित हृदयदनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, राधा मंगेशकर, कार्तिकी गायकवाड, अंजली नंदिनी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लगाटे, सुरेखा पुणेकर ते माया खुटेगावकर आदिंनबरोबर प्रोग्राम केले आहेत आपली कला देशातच नव्हे तर साता समुद्र पार नेण्याचे काम त्यांनी केले आहे यामध्ये दुबई अमेरिका लंडन ऑस्ट्रेलिया इजराइल इजिप्त यासारख्या  राष्ट्रांमध्ये तब्बल 21 वेळा आपली वाद्य संगीत कला सादर केली आहे आपल्या तबलावादनाची कला ही इतरांनाही यावी म्हणून संगीतामध्ये त्यांनी एम ए केले  तबल्यामधील अलंकार ही पदवी देखील प्राप्त केली आणि स्वतःचे विद्यालय सुरू केले आज त्यांचे सात विद्यार्थी तबला विशारद आहेत तर अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेत आहेत याचीच दखल म्हणून इंडियन गव्हर्मेंट यांच्याकडून कल्चरल डिपार्टमेंट आपल्या देशाची कला व संस्कृती इतर देशांमध्ये सादर करण्यासाठी अमोल बेलसरे यांची निवड करण्यात आली आहे आज दि.२५ नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल ऑर्गनायझर प्रदिप कदम यांच्या ग्रुपमधून सुदान, साउथ आफ्रिका, इथोपिया, इजिप्त, व इजराइल या राष्ट्रांमध्ये पंधरा दिवसाच्या दौऱ्यासाठी ते जाणार आहेत
भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र जेजुरी येथील अमोल बेलसरे ही पहिली व्यक्ती ठरली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test