सोमेश्वरनगर ! मोढवे येथे काकड आरती समाप्तीनिमित्त काल्याचे किर्तन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मोढवे याठिकाणी सर्व ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या वतीने १० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर पर्यंत
गावातील विठ्ठल रुक्माई मंदिरात काकड आरती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या समाप्ती निमित्त मंगळवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प.हनुमंत महाराज मारकड (कात्रजकर) यांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी गायनाचार्य हभप अनिल महाराज नांदलकर, राजेंद्र महाराज भांडवलकर, पखवाज वादक ऋत्विक महाराज पवार, पेटीवादक हभप मच्छिंद्र नागरगोजे यांची साथसांगत लाभली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी पदाधिकारी, महिला व मुर्टी मोढवे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.