साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेटकर्ज योजना
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेटकर्ज योजना राबविण्यात येत असून त्यासाठी २८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत मातंग समाज व त्यामध्ये अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनीमादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांगगारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या १२ पोट जातींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदार पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १८ वर्षे पूर्ण व ५० वर्षाच्या आत असावे. सीबील स्कोर किमान ५०० असावा.
योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचा सहभाग ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून ४ टक्के या व्याजदर असणार आहे. लाभार्थ्याने ३ वर्षांसाठी २ हजार ६४५ इतका मासिक हप्ता भरणे आवश्यक राहील. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी भैतिक उदिष्ट ७० प्रकरणांचे असून प्रति युनिट १ लाख रुपये प्रमाणे प्राप्त झाले आहे. महिला ५० टक्के, पुरुष ५० टक्के तसेच शहरी व ग्रामीण विभागात या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.
इच्छूक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०५७ येथे संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. मांजरे यांनी कळवले आहे.