शिक्षक बॅंकेत परिवर्तन अटळ - चंद्रकांत यादव
सातारा सातारा जिल्हा शिक्षक बॅंकेच्या निवडणूकीत सभासद परिवर्तन पॅनेलच्या लोणंद येथील प्रचारफेरीवेळी शिक्षक बॅंकेत परिवर्तन करणार असल्याचे सभासदांनी ठरवले असल्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी सांगितले.
मागील पाच पंचवार्षिक निवडणुकीमध्ये खंडाळा गटामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जो उमेदवार दिला तो उमेदवार बबनराव ठोंबरे व चंद्रकांत यादव यांनी सभासदांच्या प्रचंड विश्वासावर विजयी करून दाखवला आहे. या निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनेल ने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने दिलेला उमेदवार श्री विजय रत्नराज ढमाळ यांचा विजय सभासदांच्या प्रेमामुळे निश्चित झाला आहे. खंडाळा तालुका हा पुरोगामी विचारांचा असून नेहमीच चांगल्या विचारांना साथ देत आल्यामुळे आणि सभासद सुज्ञ असल्याने परिवर्तन पॅनेलच्या कप बशी या चिन्हावर शिक्का मारून येणाऱ्या 19 तारखेला 21-0 असा निकाल देऊन परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या प्रचारफेरीमध्ये बहुसंख्येने महिला सहभागी झाल्याचे दिसून आले. सातारा जिल्हा शिक्षक संघ महिला आघाडीच्या सरचिटणीस वर्षा ससाणे मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.गेल्या 30 वर्षांमध्ये चंद्रकांत यादव हे तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक, कार्यरत शिक्षक या सर्वांच्या अडीअडचणीमध्ये भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे मदत करत आहेत याची जाणीव तालुक्यातील सर्व सभासदांमध्ये असल्याने सभासद कोणताही विचार न करता व कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आबांच्या परिवर्तन पॅनेलला मत देतील असा विश्वास व्यक्त केला.
खंडाळा गटाचे उमेदवार श्री विजय रत्नराज ढमाळ यांनी निवडणुकीतील यशानंतर मी सभासद हिताची जपणूक करेन, तसेच पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार करून सभासद परिवर्तन पॅनलच्या जाहिरनाम्यातील वचनांची 100%पूर्तता करेन असे सांगितले.
या प्रचारफेरीमध्ये रामदास सोळसकर, संदीप राऊत, भानुदास राऊत, पी जी भरगुडे, नवनाथ भरगुडे, सुनीता मोरे, अरुणा कुरपड, मनीषा जाधव, कमल बोडरे , माया कुमरे, स्वाती सरक , हणमंतराव धायगुडे रोहिदास कापसे आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.