Type Here to Get Search Results !

देशी- गावराण गायीचा ओटी भरण व डाेहाळे जेवणाचा कार्यक्रम एक आदर्श - ह.भ.प. यशवंत महाराज कदम.

देशी- गावराण गायीचा ओटी भरण व डाेहाळे जेवणाचा कार्यक्रम एक आदर्श - ह.भ.प. यशवंत महाराज कदम.         
 
दाैंड - देऊळगाव राजे येथील देशी गायीच्या ओटीभरण व डाेहाळे जेवणाचा 
कार्यक्रम राजेशाही थाटात संपन्न झाला.
        या प्रसंगी ह.भ.प.यशवंत महाराज कदम म्हणाले की भारतीय संस्कृतीत तीन मातांना महत्त्वाचे स्थान  आहे.भूमाता,गाेमाता व जन्मदाती आई पैकी गाेमातेला महत्वाचे स्थान आहे. पवार परिवारातील कै.साै.केशरबाई (आक्का) पवार म्हणाल्या हाेत्या की आपल्या गाेठयात एकतरी देशी ( गावराण ) गाय असावी म्हणून मुलगा चंद्रकांत पवार व साै.जयश्री पवार व त्यांच्या दाेन मुलांनी आईची ईच्छापूर्ती म्हणून एका देशी गायीचे पालन,पाेषण करुन स्वत:च्या मुलीप्रमाणेच त्या गायीच्या आेटी भरण व डाेहाळे जेवणाच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयाेजन करुन चंद्रकांत पवार व साै.जयश्री पवार यांनी दाैंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्वांसमाेपर एक आदर्श ठेवला आहे.
देशी गायीला वैदिक काळापासून महत्वाचे स्थान आहे. शेतक-याची 
श्रीमंती ही त्याच्याकडे असलेल्या देशी गायीवरुन ठरवली जाते.या गायीच्या विविध गुणांमुळे व दानामुळे ती तिच्या आयुष्यात ४ लाख १० हजार ४४० लाेकांना सात्विक व सकस आहाराचे  खाद्य पुरविते.या कार्यक्रमाच्या प्रसंगी गाईला सजवून वाजत गाजत,रांगेळी व फुलांच्या पायघडया टाकून भव्यदिव्य मंडपामध्ये आणून तिची यथाविधी पूजा करुन सुवासिनींनी आैक्षण करुन आेटी भरण केले. तिला पुरणपोळी,पेढे,बर्फी,व दिपावलीच्या फराळाचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला.या वेळी माेठया संखेने महिला व नातेवाईक मंडळी उपस्थित  हाेते. उपस्थितीत महिला व नातेवाईकांनी डाेहाळे जेवनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम खूपच आगळा वेगळा झाल्याची चर्चा  उपस्थितांमध्ये रंगली हाेती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test