धनगर समाज सेवा संघाच्या वतीने
राज्यस्तरीय वधुवर मेळाव्याचे आयोजन
समाज बांधवांनी आपली नावे दिनांक १०/१२/२०२२ पर्यंत नोंदवावी असे आवाहन
जेजुरी - धनगर समाज सेवा संघ पुणे यांच्या वतीने धनगर समाज बांधवांचा पंधरावा राज्यस्तरीय वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त युवक व युवतींनी आपली नावे या मेळाव्यात नोंदवावीत असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकूंद कुचेकर यांनी केले आहे धनगर समाज सेवा संघ यांच्या वतीने दरवर्षी वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते मागील कोरोना काळात दोन वर्ष आँनलाईन व अतिशय साध्या पध्दतीने मेळावा घेण्यात आला होता या वर्षी भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय वधुवर मेळाव्याचे आयोजन पिंपळे गुरव येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय, शिवदत्त नगर, दापोडी रोड, पिंपळे गुरव, पुणे येथे करण्यात आले असुन समाज बांधवांनी आपली नावे दिनांक १०/१२/२०२२ पर्यंत नोंदवावी असे आवाहन संघाचे संचालक दर्शन गुंड, गणेश लंबाते यांनी केले आहे हा मेळावा धनगर समाजातील सर्व पोटजाती साठी असुन जवळपास पंचवीस पेक्षा जास्त जिल्ह्यामधुन समाज बांधवांनी नावे नोंदविण्यास सुरुवात केली आहे आपल्या शिक्षित व उच्च शिक्षित मुलामुलींना वधू- वर निवडीसाठी व अनुरूप जोडीदार मिळवण्यासाठी एकमेव मेळावा म्हणजे मुकूंद कुचेकर यांचा धनगर समाज सेवा संघांचा पिंपळे गुरव, पुणे येथील वधू वर मेळावा