दुर्मिळ वाघाटी जातीची मांजर पिल्लं सोमेश्वरनगर येथील ऊसफडात आढळली .
सोमेश्वरनगर - करंजेपुल (ता बारामती) येथे रविवार सकाळी च्या सुमारास बापूराव गायकवाड यांच्या ऊसाच्या फडात बिबट्यासदृश्य प्राण्याचे पिल्लू सापडले असुन सदर पिल्लु हे बीबट्याचे असल्याबाबतची चर्चा ऊस मालक व आलेले ऊसतोड मजूर करत होते. मात्र वनविभाग अधिका-यांनी समक्ष पाहणी केली. ते मार्जार (मांजर)कुळातील अत्यंत दुर्मिळ असणा-या वाघाटी जातीचे पिल्लू असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तेथील नागराकांचे शंकेचे निरसन झाले.
तसेच वनरक्षक योगेश कोकाटे यांच्या सूचनेनुसार वनमजुर अविनाश शेलार ,नवनाथ रासकर यांनी
वन्य प्राणिसंग्रहालय रेस्क्यू यांची टीम संपर्क साधला तर ती टीम सोमेश्वर येथील त्या ऊसफडात पोहचली ...त्या पिलांना मायेची ऊब देत त्यांना असलेल्या किरकोळ जखमा असल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी बारामतीला रवाना केले असल्याची माहीती बोलताना दीली.
त्या पिलांना जीवदान देण्यासाठी आदीकचे सहकार्य शेतकरी बापुराव गायकवाड,कुंडलिक गायकवाड,विनोद गोलांडे,तसेच पोलिस कर्मचारी एस एम जवीर,होमगार्ड एम एस खोमणे यांनी केले.सध्या त्या पिल्लांची प्रकृती चांगली असून लवकरच ती पिल्ले तिच्या आईच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती वन संग्रहालय व वनमजूर कर्मचारी यांनी बोलताना दिली.