वाल्हे येथे संविधान दिन उत्साहात साजरा
वाल्हे प्रतिनिधी – सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे स्थानिक स्वराज्य संस्थेसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवले गटाकडून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ ७३ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले माजी सरपंच दत्तात्रेय पवार यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वाल्हे शाखाध्यक्ष शैलेंद्र भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास भोसले सचिन भोसले अशा विविध मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी राजाराम शेडगे यांनी संविधान प्रस्तावनेचे वाचन केले.या दरम्यान विविध सामाजिक तथा राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन बालविवाहास प्रतिबंध करण्याचा निर्धार देखील केला.
या प्रसंगी वाल्हे गावचे माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ उद्योजक सुनील पवार तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी यांसह रवींद्र भोसले जयवंत भुजबळ दीपक कुमठेकर कल्पना राऊत त्रिंबक भुजबळ सुजित राऊत पोपटराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.