बारामती ! बारामतीत उद्योग व्यापार विषयक मार्गदर्शन मेळावा संपन्न
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारणी सदस्य तथा उद्योग व व्यापारी विभागाचे मार्गदर्शक पी.टी.काळे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योग विभागाचे अध्यक्ष वैभव शिंदे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
बारामती शहर व तालुक्यातील औद्योगिक विकास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून व महिलांना गृहउद्योग, तरुणांना लघुउद्योग, फूड पार्क मधून शेतीमाल प्रक्रिया उद्योग,उत्पादित मालाचे मध्यवर्ती विक्री व्यवस्थापन,घन कचरा व्यवस्थापन तसेच सर्व प्रकारच्या उद्योगासाठी महामंडळ, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या अनुदानित योजना, सुविधा उपलब्ध करून देणे सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून उद्योगाची माहिती व मदत केंद्र उभारणी करणे यासाठी सध्याची स्थिती जाणून घेत त्यावर पी.टी.काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यापार-उद्योग स्थापन करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे
मा.सभापती विठ्ठल खैरे,मा.उपसभापती दत्तात्रय सणस, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, शहर सोशल मिडियाचे अध्यक्ष तुषार लोखंडे, प्रमुख व्यापारी प्रमोद खटावकर,प्रमोद काकडे,अनिल काळे,अशोकराव तावरे,नितीन तुपे,राजेंद्र खराडे,शरद मचाले,वैभव कापसे, रघुनाथ दाभाडे, प्रविण दाभाडे,सतीश गावडे,अरविंद जगताप आदींसह व्यापारी, उद्योजक तसेच विविध संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.