सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालया चे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांची विधापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य गटातून बिनविरोध निवड झाली आहे. ही बाब महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे .गेल्या पाच वर्षात डॉ.वायदंडे हे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विधापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते .गेल्या वीस वर्षांपासून डॉ वायदंडे हे मु. सा. काकडे महाविद्यालयात कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या अनेक अधिकार मंडळांवर त्यांनी काम केले आहे. तक्रार निवारण समिती, इतिहास अभ्यास मंडळ ,परीक्षा मुल्यमापन समिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे .महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशारी यांच्या हस्ते त्यांना बेस्ट इंनोव्हेटिव्ह टीचर म्हूणून त्यांना गौवण्यात आले आहे.अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे ,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे,सचिव प्रा जयवंतराव घोरपडे,सह सचिव सतिश लकडे , महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल प्रतिनिधी व व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.