माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त निवडणूक नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे यांनी आज तहसिल कार्यालयामध्ये इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
त्यानंतर सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
यावेळी तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.