करंजे ! बहुजन समाज सेवा संघ वतीने संविधान दिन साजरा.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरातील बहुजन समाजसेवा संघ वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार विनोद गोलांडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजा केली तसेच बहुजन समाज सेवा संघाच्या वतीने गोलांडे यांना संविधान प्रत भेटे देत , हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच बहुजन समाज सेवा संघ वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष पोपट हुंबरे यांनी भारतीय संविधानाची माहिती देऊन संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच मुंबई साठी २६ नोव्हेंबर हा काळा दिवस.... या दिवशी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ही वाहण्यात आली.
यावेळी बहुजन समाजसेवा संघ अध्यक्ष पोपट हुंबरे, संघ सदस्य भैय्यासाहेब हुंबरे ,बहुजन संघ वाचनालय सुप्रिया उबाळे इतर सदस्य मान्यवर उपस्थित होते.