सोमेश्वरनगर ! मु.सा काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर येथे विशेष नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय वाघळवाडी सोमेश्वर नगर येथे आय क्यू ए सी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ द्वारा आयोजित विशेष नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले याप्रसंगी
संजय खाडे तलाठी भाऊसाहेब वाणेवाडी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आणि पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग समन्वयक प्रा. अच्युत शिंदे संरक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.आदिनाथ लोंढे सर
कनिष्ठ महाविद्यालयाचे संरक्षण शास्त्र विभागाचे प्रा. राहुल गोलांडे या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
महाविद्यालयीन युवक हा लोकशाहीचा मुख्य घटक आहे. युवकांनी मनावर जर घेतले तर लोकशाही काही दिवसात काही क्षणात अधिक बळकट व्हायला वेळ लागणार नाही.
यासाठी मा. डॉ.राजेश देशमुख साहेब जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या आदेशान्वये या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रामुख्याने मतदान नोंदणीसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांनी संविधान दिवस दिनांक २६ नोव्हेंबर ते २९नोव्हेंबर २०२२ पर्यंत महाविद्यालयामध्ये नवीन मतदार नोंदणीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
याप्रसंगी संजय खाडे यांनी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या नवीन मतदान नोंदणी मध्ये
सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशहितासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी आपण नाव नोंदणी करून सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे प्रा. वाघमारे सर प्रा. काकडे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित अधिसभा सदस्य डॉ. देविदास वायदंडे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.