आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत अहमदनगर विभागाला फ्रीस्टाईल मुले व मुलींचे सांघिक विजेतेपद.
सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले हे पुणे विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती मुले व मुली स्पर्धा २० व २१ नोव्हेंबर २०२२ रोजी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा . काकडे महाविद्यालयात पार पडल्या या स्पर्धेत अहमदनगर विभागाने फ्रीस्टाईल मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धेत सांधिक विजेतेपद मिळवले. ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात पुणे जिल्ह्याला सांघिक विजेतेपद मिळाले.
मुलांच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रमोद काका काकडे देशमुख यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती दिलीप दादा जगताप व प्रसिद्ध उद्योजक आर.एन. बापू शिंदे हे उपस्थित होते यावेळी महाविद्यालयीन नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांनी उद्घाटनपर मार्गदर्शनात खेळाडूंनी यशस्वी व्हायचे असेल तर कुस्तीतील आधुनिक तंत्रज्ञान आपलेसे केले पाहिजे अपार मेहनत व जिद्द चिकाटी ठेवावी तरच तुम्हाला यश मिळेल असे आव्हान केले.
प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी अध्यक्षीय मनोगतमध्ये ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्याप्रमाणे उपस्थित खेळाडूंनी देशाला सुवर्णपदक मिळवून द्यावे तसेच जास्तीत जास्त खेळाडूंनी आंतरविद्यापीठ स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पदके मिळवून द्यावीत असे आवाहन करून विद्यापीठाने या स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी मु.सा .काकडे महाविद्यालयाला दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले.
मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या सविताताई काकडे देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले या प्रसंगी निंबूत ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सूलभा ताई काकडे देशमुख , स्मिताताई व भारतीताई काकडे देशमुख या उपस्थित होत्या. उपस्थित महिला कुस्तीगिरांना त्यांनी शुभेच्छा देऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्याचे आव्हान केले. या स्पर्धा पुणे विद्यापीठाचे सहाय्यक क्रीडा संचालक डॉ. दत्ता महादम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या. उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शक करताना त्यांनी आंतर विद्यापीठ व खेलो इंडिया स्पर्धेसाठी ज्यांची निवड होईल त्या खेळाडूंनी जास्तीत जास्त मेहनत व आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून राष्ट्रीय स्तरावर पुणे विद्यापीठाला पदके मिळवून द्यावीत असे आव्हान केले.
मुलांच्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या याप्रसंगी त्यांनी खेळाडूंना कुस्तीतील बदललेल्या नियमांची माहिती सांगून ऑलिंपिक मध्ये पदकाची महाराष्ट्राची प्रतीक्षा नवीन खेळाडूंनी संपवावी असे सांगितले. मुलांच्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास व्यवस्थापक समिती सदस्य संकेत जगताप व पुणे जिल्हा क्रीडा विभाग सचिव डॉ. सुहास भैरट उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख , आयक्यूएसी समन्वय डॉ.संजू जाधव, संस्थेचे सहसचिव सतीश लकडे महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक, कर्मचारी इत्यादी कार्यक्रमला उपस्थित होते.
मुलींच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. जया कदम, प्रा.जयश्री सणस, व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता भोईटे तसेच सर्व महिला प्राध्यापीका उपस्थित होत्या . मुलींच्या स्पर्धा राष्ट्रीय पंच श्री मोहन खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या याप्रसंगी पंच रोहिदास आमले यांचा आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच परीक्षा प्रथम श्रेणीने पास झाल्याबदर डॉ. दत्ता महादम व प्राचार्य डॉ. देविदास वायादडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धा संयोजक सचिव डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी सूत्रसंचालन केले या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ श्रीकांत घाडगे, प्रा. दत्तराज जगताप, कर्मचारी आदित्य लकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.