झारगडवाडीच्या ग्राहकांना मिळणार पाटील कट्टा या नवीन दुकानाचा तरतरीत चहा..
डोर्लेवाडी : झारगडवाडीत जय बजरंगबली अमृततुल्य पाटील कट्टा या दुकानाचे उद्घाटन डोर्लेवाडी - निरावागज गटातील संभाव्य उमेदवार अविनाश भिसे आणि राजेंद्र बोरकर यांच्या हस्ते पार पडले. यामुळे आता झारगडवाडीच्या ग्राहकांना पाटील कट्टा या दुकानाचा तरतरीत चहा पियायला मिळणार आहे.
यावेळी चे सरपंच पद्मनाभ निकम, माजी सरपंच नितीन शेडगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बोरकर, संतोष मासाळ, पोपट कुलाळ, सोसायटीचे माजी चेअरमन परशुराम बोरकर, संचालक अंकुश निकम, गुनवडीचे सोसायटी चे संचालक जनार्दन बोरकर, गणेश बोरकर, नानासो लोखंडे, अक्षय (भैया) आवटे, ग्रामविकास अधिकारी भिवाजी काळे, योगेश बोरकर, भिवा बोरकर, अशोक करे आदी मान्यवर उद्घानप्रसंगी उपस्थित होते.
चहाची तलब झाली की माणूस आपसूकच चहाच्या दुकानाकडे वळतो सध्या शहरी भाग असो की ग्रामीण भाग सगळीकडेच चहाची दुकाने पहायला मिळत आहेत. सध्या थंडीचे दिवस आहेत यामुळे अंगात तरतरी आणि आळस घालवण्यासाठी अनेक जण चहा पितात. यात मोठ्या प्रमाणात चहाच्या कंपन्यानी आपल्या एजन्सी फ्रॅंचायशी दिल्याने अनेक ठिकाणी चहाची दुकाने थाटली गेली आहेत. डॉर्लेवाडी आणि झारगडवाडी या ग्रामीण भागात देखील अनेक जणांच्या फ्रॅंचाईजी ची चहाची दुकाने झाली आहेत यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची तलप घालवण्यासाठी ग्राहकांना मनसोक्त आनंद मिळत आहे.
फोटो - झारगडवाडी ( बारामती ) येथे ग्रामपचायत गाळयात पाटील कट्टा या नवीन दुकानाचे उद्घाटन करताना मान्यवर..