भूमि अभिलेख विभागाची .... नोव्हेंबर दरम्यान परीक्षा
पुणे, भूमि अभिलेख विभागाकडील गट क पदसमूह ४ (भूकरमापक व लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे असे भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी कळविले आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in वर लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्यावरील नमूद परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.