राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते सोमेश्वरनगर येथे "भाजपा युवा मोर्चा" शाखा फलकाचे उदघाटन संपन्न.
सोमेश्वरनगर शाखाध्यक्ष पदी सुधीर गायकवाड.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील करंजेपुल, होळ , गडदरवाडी, वडगाव निंबाळकर , कोऱ्हाळे या गावांमध्ये शुक्रवार दि.११ रोजी भारत सरकारचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते सोमेश्वरनगर , होळ , गडदरवाडी, वडगाव निंबाळकर , कोऱ्हाळे या ठिकाणी "भाजपा युवा मोर्चा" शाखेचे उदघाटन करण्यात आले तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतले यावेळी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी आमदार राम शिंदे , माळेगाव कारखाना माजी चेरमन रंजनकाका तावरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे , तालुकाध्यक्ष युवा मोर्चा ज्ञानेश्वर माने , सोमेश्वर कारखाना माजी संचालक प्रकाश जगताप , बारामती तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सुशांत सोरटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा इंद्रजीत भोसले, भारतीय जनता पार्टी बारामती सचिव हनुमंत शेंडकर,सहकार आघाडी अध्यक्ष तथा करंजेपूल तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड , नवनिर्वाचित सोमेश्वर शाखाध्यक्ष सुधीर गायकवाड , मयूर बांदल , विशाल पवार , राजेश जाधव सह मान्यवर उपस्थित होते.
.....
चौकट...
सोमेश्वरनगर परिसरातील वाड्यावास्त्यांवर "भाजपा युवा मोर्चा" शाखा स्थापना करत पक्ष वाडीस प्रयत्न करणार.
नवनिर्वाचित "भाजपा युवा मोर्चा"सोमेश्वर शाखाध्यक्ष सुधीर गायकवाड.