मोरगाव ! अक्षय काकडे यांनी वाढदिवस दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना दिली मायेची ऊब.
वाढदिवसाचे औचित्य साधत शाळेत मुलांना स्वादिष्ट जेवण तर उबदार स्वेटरची भेट.
मोरगाव - मोरगावचे उद्योजक अक्षय काकडे-देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,वाढदिवसाचा खर्च टाळून सुपा(बारामती)येथील प्राजक्ता मतिमंद निवासी शाळेत मुलांना रुचकर जेवण तर उबदार स्वेटर शुक्रवार दिनांक २५ रोजी उपस्थित २० मुलांना दिले तसेच व्यवस्थापक गणेश भुजबळ कर्मचारी मामा गणपत शितोळे याच्या उपस्थितीत वाटप केले आणि तरुण पीडिला एक नवीन आदर्श ठेवला.तरुण वर्गाने सुद्धा अनावश्यक खर्च टाळत असे वाढदिवस करावे असा सदेशही दिला.
यावेळी उद्योजक सागर शिनगारे,युवा नेतृत्व गणेश काशीद, बंडा काशीद, उद्योजक मंगेश जगताप,उद्योजक संदेश जगताप,नितिन थोरात, सादिकभाई पानसरे, रोहित पवार ,अजिंक्य तावरे,आशिष जाधव,उपस्थित होते.