सोमेश्वरनगर ! मु.सा. काकडे महाविद्यालयात मुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविदयालयात शनिवार दि. १५ रोजी मुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्ला आंतरमहाविदयालयीन क्रीडा स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुशराव आहेर प्राचार्य विश्वासराव रणसिंग महाविदयालय कळंब यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी मु.सा.काकडे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ देवीदास वायदंडे सहसचिव सतीश लकडे पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव डॉ.सुहास भैरट महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे उपप्राचार्य डॉ.जया कदम उपप्राचार्य डॉ.प्रवीण ताटे देशमुख आय क्यू ऐसी समन्वयक डॉ. संजू जाधव व्यवस्थापन समिती सदस्या सुजाता भोईटे उपस्थित होत्या
उद्घाटनपर मार्गदर्शनामध्ये डॉ. अंकुश आहेर सर यांनी खेळाडूंना खेलाडुवृतीने खेळून पुणे जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून विद्यापिठाच्या संघामध्ये जास्तीत जास्त मुलींनी प्रतिनिधीत्व करावे व कमी वेळामध्ये मु.सा. काकडे महाविदयालयाने या स्पर्धा आयोजन करण्यासाठी क्रिडविभागाला सहकार्य केल्याबद्दल प्राचार्य डॉ.देवीदास वायदंडे सर यांचे आभार मानले. प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा क्रीडा विभाग यांनी आमच्या महाविद्यालयास क्रीडास्पर्धा आयोजनाची अशी संधी दिल्यास महाविद्यालय नेहमीच सहकार्य करेल अशी उपस्थितांना ग्वाही दिली व मुलांच्या खो-खो स्पर्धेप्रमाणे याही स्पर्धा पारदर्शकपणे यशस्वीरीत्या पार पाडू कोणतीही उणीव भासू दिली जाणार नाही असे आवाहन करून मुलींनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे जेणेकरून पुणे जिल्लाचा संघ निवडसमितीत चांगला निवडता येईल.
या स्पर्धेमध्ये ऐकूण २१ महाविद्यालयातील २२२ मुलींनी सहभाग नोंदविला होता .
स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक पुढीप्रमाणे
१) प्रथम क्रमांक - कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय इंदापूर
2) द्वितीय क्रमांक - इंद्रायणी महाविद्यालय तलेगावदाभाडे
३) तृतीय क्रमांक- कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव
विजेत्या संघांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे देशमुख यांनी केले व त्यांना विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी महाविद्यालयामधे विद्यार्थांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी अशाप्रकारचे उपक्रम सतत राबवावेत असे सांगितले व मैदानावरील खेळाडूंना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरविल्या जाव्यात असे सांगितले
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुणे सातारा जिल्ह्यातील खो-खो पंचाना निमंत्रित केले होते स्पर्धा संयोजक सचिव डॉ. बाळासाहेब मरगजे,डॉ. श्रीकांत घाडगे, प्रा.दत्तराज जगताप व कर्मचारी निखिल जगताप, आदित्य लकडे, शुभम येळे, प्रफुल्ल काकडे व खेळाडू विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.