पावसापावसा थांब रे.... तुला देतो खोटा पैसा रे... अशी म्हणण्याची वेळ या परतीच्या पावसाने आणली आहे.
सोमेश्वरनगर - राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस चंगलाच कोसळत आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी मात्र, चिंतेत आहेत. या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे, सध्या पिकांच्या काढणी बाजरी, सोयाबीन हंगाम सुरु आहे, अशातच परतीच्या पावसानं हजेरी लावण्यानं पिकांचे नुकसान होत आहे. तर शेतात उभ्या पिकात पाणी साठले आहे.तसेच सर्वत्र सध्या पाणीच पाणी असे दृश्य पहावयास मिळत आहे,,ओढे, नाले सर्वच फुल झाले आहे..जिल्ह्यात गेली आठ दिवस परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, रोजच सकाळ ...संध्याकाळ पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळं सर्वत्र शेतकरी चिंतेत आहेत. कारण शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन ,बाजरी, पावसामुळं पूर्णतः भिजलं असून, याचा मोठा शेतकऱ्यांना बसला आहे. पूर्वी किंव्हा आत्ताही लहान मुलं पाऊस पडावा म्हणून पावसात नाचत ...येरे येरे पावसा तुला देतो पैसा ...पैसा झाला खोटा ...पाऊस आला मोठा...अन पाऊस पडायचा ....परंतु ऑक्टोबर महिन्यातील परतीचा पाऊस ज्यास्त असल्याने... शेतकरी तसेच जेष्ठ नागरिक सध्या...पावसापावसा थांब रे.... तुला देतो खोटा पैसा रे... अशी म्हणण्याची वेळ या परतीच्या पावसाने आणली आहे. जिल्ह्यातही या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे.गेले काही दिवस जिल्ह्यात सह बारामती तालुक्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरु आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यापवासमुळं शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन, बाजरी पूर्णतः भिजलं आहे. यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकलसान झालं आहे. या पावसानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार तर ढगफुटी दृश्य पवसाला सुरुवात झाली आहे. शेतातील पिकं काढणीच्या वेळेसच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळं हाताशी आलेली पिकं वाया जात आहेत. सध्या सोयाबीन आणि बाजरी काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.