करंजेपुल येथे "आनंदाचा शिधा" दिवाळीच्या तोंडावर स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना वाटप.
सोमेश्वरनगर - प्रत्येक रेशन कार्डाच्या मागे चार शिध्याचे एक किट म्हणजेच "आनंदाचा शिधा" दिवाळीच्या तोंडावर दिला जाणार असून पुणे जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोचला आहे. सर्वत्र स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना हा शिधा वाटप केला जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी काेरोनाच्या संकटानंतर या वर्षी पहिल्यांदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असून राज्य सरकारने गरिबांना रास्त भावात एक शिध्याचे किट उपलब्ध केले आहे.
शहर व ग्रामीण गोदामअंतर्गत संपूर्ण शिधा उपलब्ध झाला असून तीन दिवसांच्या आत हा शिधा वाटप करण्याच्या सूचना तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहेत.
या अनुषंगाने बारामतीतील करंजेपुल येथील स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना हा शिधा वाटप शुक्रवार दि २१ रोजी करण्यात आला याप्रसंगी करंजेपुल आदर्श सरपंच वैभव गायकवाड, गणेश गायकवाड, सैनिक विकास लकडे सह लाभार्थी उपस्थित होते
करंजेपुल ग्रामस्थांनी "आनंदाचा शिधा" स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना वाटप चालू आहे .तो लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा अशी सूचना करंजेपुल आदर्श सरपंच वैभव गायकवाड यांनी केली.