जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य होणार उज्ज्वल...!
"शिशु विकास योजना" : मुलांना आरोग्य विमा, उच्च शिक्षण,शिष्यवृत्तीचा मिळणार लाभ.
फोटो ओळी : शिशु विकास योजना
बारामती : शिशु विकास योजने अंतर्गत देशातील २० कोटी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होणार असून त्यांना अपघाती, आरोग्य विमा, उच्च शिक्षण,शिष्यवृत्ती व स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत अशा विविध योजनेचा फायदा विद्यार्थ्याना होणार आहे.
या योजनेत ३ लाख रूपयांचा अपघात विमा मिळेल. या योजनेत २.५० लाख रूपयांचा आरोग्य विमा मिळेल.
(दरवर्षी २५००० रूपये प्रमाणे),या योजनेत फक्त मुलीसाठी शिष्यवृत्ती देण्यात आली असून मुलीने इयत्ता ६ वीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर तिला ३ हजार रुपये शिष्यवृत्ती च्या स्वरूपात मिळेल. इयत्ता ८ वीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर ५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. इयत्ता १० वीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर ७ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. मुलीचे वय २१ वर्ष झाल्यानंतर २ लाख रूपयेचा स्वयंरोजगारासाठी तिला आर्थिक मदत मिळेल. ५ लाख रूपये पर्यंत उच्च शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. गो डिजिट इन्श्युरन्स कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना आरोग्य विमा व अपघाती विमा दिला जातो.
यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र,फोटो, फॅमिली फोटो रजिस्टर्ड मोबाईल नंबर,ई-मेल आय डी ची आवश्यकता असणार आहे. तर महाराष्ट्रातील अनेक मुलींच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाला आहे. कोरोना आपत्तीमध्ये हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यास पाल्याला ११ हजार रुपयांची मदत दिली जाणार असून या आजारामुळे पाल्य किंवा पालक यांच्यापैकी कोणाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्यास १ लाखांचे विमा कवच उपलब्ध करून दिले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक सुरक्षा देणे हाच संस्थेचा हेतू आहे. लवकरच पुणे जिल्ह्यात कॅशलेस हॉस्पिटल, अॅम्ब्युलन्स यांची सोय केली जाणार आहे. यासाठी पालकांकडून एका विद्यार्थ्यासाठी एकदाच २९५ रुपये व अधिक सर्विस सेवाशुल्क १०५ (एकूण ४००) आकारले जाणार आहे. ही संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया असून आपली माहिती मोबाईलद्वारे देता येऊ शकणार आहे. पालकांनी "शिशु विकास योजनेच्या" तालुका प्रतिनिधी ९७६२२०८४३७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पार्टनर सतीश बूच्चे यांनी केले आहे.