"सोमेश्वरचा" गळीत हंगाम शुभारंभ ९ ऑक्टोंबर रोजी - पुरुषोत्तम जगताप
शुभारंभ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारसो यांच्या शुभहस्ते होणार.
सोमेश्वरनगर(ता.बारामती) येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२०२३ चा ६१ वा गळीत हंगाम शुभारंभ रविवार दि. ९
ऑक्टोंबर २०२२ रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारसो यांच्या शुभहस्ते व राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आमदार मकरंदआबा पाटिल, संजयजी जगताप,दिपकआबा चव्हाण, माळेगाव सह साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेबभाऊ तावरे, छत्रपती सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, पीडीसीसी बॅकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर
दुर्गाडे, पीडीसीसी बॅकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार असुन यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारलेल्या गर्ल्स होस्टेल, एमबीए कॉलेज, इंजीनअरींग कॉलेज, सोमेश्वर सार्वजनिक वाचनालय व सोमेश्वर कारखाना कामगार पतपेढी या सर्व संस्थांच्या नुतन इमारतीचे उद्घाटन तसेच कारखान्याच्या को जन विस्तारवाढ प्रकल्पाचा
शुभारंभ, कारखाना सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाचे उद्घाटन, कारखाना कामगार वसाहतीमधील ३ इमारतींचे उद्घाटन व जाहीर शेतकरी मेळाव्याचे आयोजन यावेळी करण्यात आल्याची माहिती जगताप यांनी दिली. कारखान्याचा सन २०२२-२०२३ चा ६१ वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या सुवद्य पत्नी व व्हाईस
चेअरमन आनंदकुमार होळकर व त्यांच्या सुवद्य पत्नी यांच्या शुभहस्ते बुधवार दि.५/१०/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केला असुन गाळप हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे प्रगतीपथावर
असल्याची माहिती जगताप यांनी दिली